
विभागी आयुक्तांची पाचही जिल्ह्यांत विशेष मोहीम सुरू. जिल्हाधिकाऱ्यांचे आंदोलनाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश
पुणे:- पुणे जिल्हा आणि शहरात फोफावलेल्या अवैध गॅस रिफिलिंग आणि गॅस चोरीच्या रॅकेटविरुद्ध ‘रिपब्लिकन संघर्ष सेनेने पुकारलेल्या एल्गाराला अखेर मोठे यश आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तर विभागी आयुक्त कार्यालयाकडून विभागातील पाचही जिल्ह्यांत गॅस माफियांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जाणार आहे. हा लढा केवळ आर्थिक फसवणुकीविरुद्ध नसून मानवी वस्तीत पेरलेल्या ‘जिवंत बॉम्ब’ विरुद्ध असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि उपनगरांमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस चोरून त्याची अवैध विक्री करण्याचे प्रमाण वाढले होते. या लढ्यांतर्गत संघटनेने केवळ तक्रारीच केल्या नाहीत, तर प्रत्यक्ष कारवाईतही सहभाग नोंदवला आहे: १. हडपसर आणि वारजे पोलीस स्टेशनमध्ये अवैध साठवणूक व रिफिलिंग संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.२. दिनांक २८/०१/२०२६ रोजी, नागरिकांना २ ते ३ किलो गॅस कमी देऊन लूट करणारा एक भरलेला टेम्पो पकडण्यात आला. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने ही मोठी कारवाई करण्यात आली. आळंदी-मरकळ रोडवरील ‘देगलूरकर गॅस एजन्सी’ येथे प्रत्यक्ष पाहणी दरम्यान लोखंडी पोंगळीच्या साहाय्याने गॅस चोरी करण्याचे धक्कादायक प्रकार उघड झाले.
या चोरीमुळे होणारा तोटा:१. आर्थिक लूट: एका सिलिंडरमधून २ ते ३ किलो गॅस चोरून प्रत्येक ग्राहकाची ₹१५० ते ₹२५० रुपयांची लूट केली जात होती.२. जीवघेणा धोका: मानवी वस्त्यांमध्ये अवैध रिफिलिंग करताना कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसते. थोडी जरी गळती झाली तरी हवेत गॅस पसरून क्षणार्धात मोठा भडका उडू शकतो. सिलिंडरचा स्फोट हा एखाद्या आरडीएक्स (RDX) स्फोटासारखा शक्तिशाली असतो, ज्यामुळे संपूर्ण इमारती कोसळू शकतात.
प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने २६ जानेवारी रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या आदेशानुसार संघटनेच्या वतीने श्रीकांत दारोळे (राष्ट्रीय सचिव) व फिरोज शेख (जिल्हाध्यक्ष पुणे ) यांनी आमरण उपोषणाचे पाऊल उचलले होते. पोलिसांच्या आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी उपोषण स्थगित करून संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखालील एका बलाढ्य शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पुराव्यांचे निवेदन सादर केले.या शिष्टमंडळात खालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता: * शशिकांत कांबळे (संस्थापक अध्यक्ष) * श्रीकांत दारोळे (राष्ट्रीय/राज्य सचिव) * एकनाथ अडसूळ (महाराष्ट्र अध्यक्ष) * सुभाष सहजराव (महाराष्ट्र उपाध्यक्ष) * अमित बगाडे (महाराष्ट्र कार्याध्यक्ष) * अंकुश सोनवणे (महाराष्ट्र संघटक सचिव) * फिरोज शेख (पुणे जिल्हा अध्यक्ष) * स्वप्निल जगताप (पुणे शहर सचिव) * सोहेल शेख (पुणे शहर कार्याध्यक्ष)यासोबतच संघटनेचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांचा दणकाशिष्टमंडळाने सादर केलेल्या पुराव्यांची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी संबधित गॅस एजन्सींची सखोल चौकशी करून त्यांचे परवाने रद्द करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच विभागीय आयुक्तांनी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाचही जिल्ह्यांत गॅस चोरी आणि रिफिलिंग विरोधात विशेष मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
“सामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि ग्राहकांची लूट करणाऱ्या गॅस एजन्सींना आता चाप बसेल. “हा लढा केवळ एका एजन्सी विरुद्ध नाही, तर प्रत्येक गृहिणीच्या हक्कासाठी आणि सुरक्षिततेसाठी आहे. जे गॅस माफिया सामान्यांच्या जीवाशी खेळत आहेत, त्यांना तुरुंगाची हवा खावीच लागेल. प्रशासनाने दिरंगाई केल्यास “जर १५ दिवसांत ठोस कारवाई झाली नाही, तर आम्ही पुन्हा तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसू. हा लढा प्रत्येक गृहिणीच्या हक्कासाठी आणि सुरक्षिततेसाठी आहे.”- श्रीकांत दारोळे (राज्य सचिव, रिपब्लिकन संघर्ष सेना)
संभाव्य धोके आणि स्फोटाची तीव्रता: * गॅस गळती (Gas Leakage): रिफिलिंग करताना कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसते. थोडी जरी गळती झाली तरी हवेत गॅस पसरून क्षणार्धात मोठा भडका उडू शकतो. * सिलिंडरचा स्फोट: अनधिकृत पद्धतीने गॅस भरल्यामुळे सिलिंडरच्या ‘वाल्व्ह’वर प्रचंड ताण येतो. यामुळे सिलिंडरचा स्फोट झाल्यास तो एखाद्या आरडीएक्स (RDX) स्फोटासारखा शक्तिशाली असतो, ज्यामध्ये आजूबाजूच्या इमारती पत्त्यासारख्या कोसळू शकतात. * अग्निशमन यंत्रणेचा अभाव: या अवैध अड्ड्यांवर आग विझवण्याचे कोणतेही साधन नसल्याने, छोटीशी ठिणगी सुद्धा शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी घेऊ शकते.
नागरिकांनी सावधान राहावे! (महत्त्वाच्या सूचना)गॅस चोरी रोखण्यासाठी ग्राहकांनी खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे: * वजन तपासून घ्या: डिलिव्हरी बॉय कडून सिलिंडर घेताना तो काट्यावर मोजून (१४.२ किलो गॅस + सिलिंडरचे वजन) घेतल्याशिवाय घेऊ नका. * सीलची खात्री करा: सिलिंडरचे सील तुटलेले असल्यास किंवा त्यावर छेडछाड वाटल्यास तो परत करा. * तक्रार नोंदवा: आपल्या भागात कुठेही अवैध रिफिलिंग सुरू असल्याचे आढळल्यास तात्काळ पोलीस किंवा पुरवठा विभागाशी संपर्क साधा.या यशस्वी लढ्यामुळे रिपब्लिकन संघर्ष सेनेचे सर्वत्र कौतुक होत असून, सर्वसामान्य ग्राहकांना आता मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
